Friday, July 1, 2022

नगर ब्रेकींग: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापे ;तीन महिलांची केली सुटका

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डीवायएसपी संदीप मिटके यांनी अहमदनगर शहरातील वाणीनगर व केडगाव येथील अंबिकानगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापे टाकून पाच पिडीत महिलांची सुटका करत तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या धडक कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील वाणी नगर व केडगाव येथील अंबिकानगर येथे हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती

गुप्त बातमीदारामार्फत डीवायएसपी संदीप मिटके यांना समजली. माहितीची खातरजमा करून डीवायएसपी संदीप मिटके यांनी पथकासमक्ष वाणी नगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर पंचासमक्ष छापा टाकला.

यामध्ये पिडीत एका परप्रांतीय (बंगाली) महिलेची सुटका केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक एकनाथ लांडगे (वय 30) व सागर जाधव यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

डीवायएसपी संदीप मिटके यांनी पथकासह केडगाव येथील अंबिकानगर येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोना. शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

आरोपी योगेश पोपट ओव्हळ (रा. माळीवाडा, अहमदनगर) याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात स्त्रीयांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पोलिस निरीक्षक गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, स.फौ. राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ. सुरेश औटी, पो. कॉ. तरटे, अमोल शिरसाट,

चेतन मोहिते,गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, मपोकॉ. जयश्री सुद्रिक, मपोकॉ. प्रियंका भिंगरदिवे आदींनी केली.नगर शहराचा चार्ज घेतल्यानंतर

डीवायएसपी संदीप मिटके यांनी एकाचवेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकून तीन पिडीत महिलांची सुटका करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!