माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यामुळे जवळे गाव सुन्न झाले आहे. पोेलिसांची अनेक पथके विविध अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
त्या नराधमाचा शोध घेण्यासाठी आहोरात्र परीश्रम घेत असून अतिशय नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आलेल्या या गुन्हयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी पाच प्रमुख संशयीतांच्या डीएनए तपासणीसाठी नमुणे घेतले असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
या तपासाबाबत पोलिसांकडून अतिशय गुप्तता पाळण्यात येत आहे. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्याचा तपशील मात्र सार्वजनीक केला जात नाही. या गुन्हयाच्या मुळापर्यंत जाऊन आरोपी नराधमाच्या
मुुसक्या अवाळण्याची विश्वास मात्र पोलिस व्यक्त करीत आहेत .अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पीडीतेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर तिचा खून करण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात ते स्पष्ट झाल्यानंतर
त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. घटनेनंतर अनेक संशयीत तपासण्यात आले. अनेकांना पोलिसांचा खाक्याही दाखविण्यात आला, तरीही घटनेच्या मुळापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले नाही. मुलगी वापरीत असलेल्या
मोबाईलमधील सीमकार्ड, त्या नंबरवर झालेले फोन याचाही छडा लावला जात आहे.अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारे विविध मार्ग अनुसरूनही हाती ठोस पुरावा येत नसल्याने पोलिसांनी पाच प्रमुख संशयीतांचे
डीएनए नमुणे तपासणीसाठी घेतले आहेत. ते पुढे पाठविण्यात आले असून त्यातून काही हाती न लागल्यास आणखीही डीएनए नमुणे तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहीती आहे. ही यादी चाळीस जणांची असल्याचेही समजते.