माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडच्या काही वर्षात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरुपात होताना दिसत आहेत. त्यातच कोरोना महामारीच्या काळात देवाण-घेवाण आणि आर्थिक व्यवहारांसाठी बहुतांश लोक डिजिटल ट्रॅन्झॅक्शनचा वापर करत आहेत.
युपीआयद्वारे केले जाणारी आर्थिक देवाणघेवाण मागील काही वर्षात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कोट्यवधी भारतीय याचा वापर दैनंदिन आयुष्यात करताना दिसतात. मात्र त्याचबरोबर युपीआय ट्रान्झॅक्शनशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारात वाढ झाली आहे.
अशावेळी नागरिकांनी युपीआयचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कधीही पैसे घेण्यासाठी युपीआय पिनचा वापर करू नका. जर कोणत्या व्यक्तीला तुम्ही पैसे ट्रान्सफर करत आहात हे माहित नसेल तर फंड ट्रान्सफर करू नका.
अनेकवेळा फसवणूक करणारे क्युआर कोडच्या मदतीनेदेखील लोकांची फसवणूक करतात. कोणत्याही व्यक्तीकडून पेमेंट घेण्यासाठी कधीही क्युआर कोड स्कॅन करू नका. कधीही कोणत्याही व्यक्तीला आपला युपीआय वॉलेटचा पिन, कार्ड डिटेल्स,
पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, ग्रिड व्हॅल्यू, कार्डचा प्रकार इत्यादी माहिती देऊ नका. जर एखादी व्यक्ती कोणत्याही बॅंकेचा कर्मचारी असल्याचे सांगत असेल तरीहीदेखील ही माहिती देऊ नका, सावध राहा.
कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आधारावर कोणताही थर्ड पार्टी अॅप उदाहरणार्थ स्क्रीनशेअर, एनीडेस्क, टीमव्युहर इत्यादी डाउनलोड करू नका. जर कॉल करणारा व्यक्ती कोणत्याही बॅंक किंवा वॉलेट कंपनीकडून असल्याचा दावा करत असेल तरीही सावध राहा.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून रिक्वेस्ट दिल्यावर किंवा सूचना केल्यावर अॅप, युपीआय अॅप, पेमेंट वॉलेट इत्यादी डाउनलोड करू नका.
गुन्हेगार तुमच्या नंबरचा बनावट सिम घेऊन देखील फ्रॉड करू शकतात. यापासून सावध राहण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून येणाऱ्या टेक्स्ट मेसेज, ईमेल इत्यादींचे उत्तर देऊ नका. विशेषत: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापासून सावध राहा.
युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हा एक डिजिटल पेमेंटचा प्रकार आहे, जो मोबाइल अॅपद्वारे काम करतो. अॅपद्वारे तुम्ही पैशांची देवाणघेणाण करता. युपीआयद्वारे तुम्ही बिलभरणे, ऑनलाइन फंड ट्रान्सफर, नातेवाईकांना पैसे पाठवणे इत्यादी कामे करू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनमध्ये अॅप डाउनलोड करावे लागते. तुमचा मोबाइल नंबर तुमच्या बॅंक खात्याशी लिंक असावा लागतो.