Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड; विखे पाटील व मुरकुटे गटाला मोठा धक्का 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. नियमांचा आधार आणि राजकीय कुरघोड्या करीत पदे मिळविण्यासाठीची कसरत थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना हा धक्का मानला जात आहे.श्रीरामपूर पंचायत समिती २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे व संगीता शिंदे असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले.

सभापती निवडीच्या वेळी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे आठ सदस्य असणाऱ्या पंचायत समितीमध्ये डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्य त्या प्रर्गात मोडत होत्या. त्या दोघीही एकाच पक्षाच्या असल्या तरी त्यावेळी नेमकी तालुक्यात वेगळी राजकीय समीकरणे सुरू झाली होती.

काँग्रेस पक्षाने सभापती पदासाठी डॉ. वंदना मुरकुटे यांची उमेदवारी घोषित केली. मात्र, ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापती पद मिळवले. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्याने अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली.

पुढे त्यावर कायदेशीर लढाई सुरू झाली. सभापती शिंदे यांनीही वेळोवेळी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालायत, तेथून पुढे सर्वोच्च न्यायालयात शिंदे यांनी दाद मागितली. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. तेथेही शिंदे यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे शेवटी पुन्हा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिंदे यांना या पदावर राहण्यास अपात्र ठरविले. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अहर्ता अधिनियम १९८६ मधील कलम ३(१) (ब) मधील

तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. त्यामुळे शिंदे यांचे पद रद्द झाले असून काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्या वतीने ॲड. दत्ता घोडके व ॲड. समीन बागवान, अॅड माणिकराव मोरे यांनी कामकाज पाहिले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!