Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार: तीन अल्पवयीन मुलींचे विवाह ;तब्बल ३३ जणांविरोधात गुन्हा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन तीन मुलींचे विवाह लावण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथील चाइल्डलाइन संस्थेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.फिर्यादी भगवान भिवसेन

खेडकर यांना रविवारी (ता. २४) दुपारी अडीचच्या सुमारास अल्पवयीन तीन मुलींचे विवाह लावले जात असल्याची माहिती चाइल्डलाइन संस्थेने दिली. त्यानंतर खेडकर गावात गेले असता, एक मंदिरासमोर, गावाबाहेरील वस्तीवर दुसरा, तर गावातीलच

एका घरासमोर तिसरा विवाह झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी वधूंच्या वयासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी गावातील शाळेत जाऊन केली असता, दोन मुली अल्पवयीन असल्याचे आढळून आले. तिसरी मुलगी बीड जिल्ह्यातील असून, खेडकर यांनी

तिच्या गावात जाऊन शाळेतील दाखल्याची तपासणी केली. तीही अल्पवयीन असल्याचे समोर आले. आज (मंगळवारी) खेडकर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही नवरदेव, मुला-मुलींचे आई-वडील, लग्न लावून देणारे नातेवाईक व पुरोहित,

मंडपवाला, अशा ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल एस. बी. बटुळे तपास करीत असून, या घटनेतील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.वरातीदरम्यान झाला होता

वाद गावातील मंदिरासमोरील विवाहसोहळ्यात मंगलाष्टके सुरू असताना एका नवरदेवाची वरात वाजतगाजत आली. यावेळी मंगलाष्टक थांबविण्यावरून दोन्ही विवाह सोहळ्यांतील वऱ्हाडींत वाद झाला होता. एक लग्न ज्या पुरोहिताने लावले, तो त्याचा पहिलाच विवाहसोहळा होता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!