माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी ठोठावली.
राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठाजवळ 2020 मध्ये ही घटना घडली होती. खटला सुरू झाल्यानंतर अवघ्या 27 दिवसांमध्ये निकाल लागला आहे.तरुणी ही श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील नातेवाईकांना भेटायला जाण्यासाठी
ता.2 फेब्रुवारी 2020 रोजी एका गावातील बसस्थानकावर आली होती. आरोपी आसिफ पठाण हा दुचाकीवरून बसस्थानकावर आला. त्याने या तरुणीला फसवणूक राहुरी कृषी विद्यापीठाजवळ आणले. ” माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणून तिच्यावर
अत्याचार करू लागला. तिने नकार देताच असिफने सत्तूरने पीडितेवर सपासप वार केले. तरुणी ही अनुसूचित जाती-जमातीमधील आहे, हे माहित असून तिला जातीवाचक शिवीगाळ केली.या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी
असिफ याच्याविरुद्ध खुनी हल्ल करणे, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास केला. उपनिरीक्षक राक्षे यांनी या तपासात महत्वाची भूमिका निभावली. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी, डॉक्टर, तपासी अधिकारी मदने, राक्षे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. खुनी हल्ला केल्याबद्दल सात वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला.
दंडापैकी 30 हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश दिला आहे. ॲड. अनिल ढगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.