Monday, December 6, 2021

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर तरुणाचे वडील गणेश मच्छिंद्र वाडेकर हे नगरपालिकेत मार्केट यार्ड येथे पाण्याच्या टाकीवर वोलमन म्हणून काम करीत होते. या ठिकाणी असलेले सह कर्मचारी व पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांचा त्रास असल्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्या

केल्याचा आरोप वाडेकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या अर्जात दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात केल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सदरचा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्या आई-वडीलांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच तो मृत्यू पावला होता. या घटनेने वाडेकर गल्लीसह रंगारगल्ली, चंद्रशेखर चौक परिसरात शोककळा पसरली असून इतक्या लहान वयाच्या तरुणाने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत तरुणाचे वडील संगमनेर नगरपरिषदेत लिपीक पदावर तर त्याची आई घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत आहे. या दोन्ही घटना दिवाळीच्या ऐन तोंडावर घडल्याने संगमनेरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत विविध

गुन्हेगारी घटना, हिंदुत्त्वादी संघटनांचे आंदोलन, पोलीस अधिकार्‍यांवरील कारवाईच्या चर्चा आणि त्यातून रंगलेले थोरात-विखे राजकीय नाट्य यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असताना कृष्णा करपे याचा अपघाती तर श्रेयस वाडेकर याच्या अकस्मात मृत्यूच्या वार्तेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:नगर जिल्ह्यातील या बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावले निर्बंध…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर अर्बन को ऑप बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन संचालक मंडळाने कारभार हाती घेतला आहे. मात्र आता रिझर्व्ह बँकेचे अर्बन...

चिंता वाढली! महाराष्ट्रात इतक्या लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण

माय महाराष्ट्र न्यूज:ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक गटाची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत लहान मुलांच्या...

या अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो

माय महाराष्ट्र न्यूज:एका अभिनेत्री आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड...

ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळाबाबत शिक्षणमंत्री यांचं महत्त्वाचं विधान…

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन...

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना शाळा बंद राहणार का? आरोग्यमंत्री टोपेंने केले मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सध्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा...

नगर ब्रेकिंग:वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर...
error: Content is protected !!