Saturday, January 22, 2022

राज्यात निर्बंध शिथील करण्यात येत असतानाच मोठा निर्णय;हा आदेश लागू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्राला गती देण्यासाठी बहुतेक सर्वच आस्थापना आणि व्यवहार आता सुरू झाले आहेत. असे असताना करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा

अनुभव लक्षात घेऊन निर्बंध शिथील करताना तितकीच दक्षता घेण्याचेही सरकारने ठरवले आहे.दरम्यान ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने नवा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये

मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबतही या आदेशात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहे.

असा आहे आदेश…

१. राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालये, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

२. या सर्व कार्यालयांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख वा आस्थापना प्रमुख यांनी करावी. लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घ्यावे.

ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करावे किंवा नजीकचे केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून त्याची पूर्तता करून घ्यावी.

३. मास्कचा सुयोग्य वापर आणि लसीकरण पूर्ण करून घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख वा कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा अधिकाऱ्याला नामनिर्देशित करावे.

४. सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिकाऱ्याला नियम मोडणाऱ्याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील.

५. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्यात येईल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!