Saturday, January 22, 2022

भाजपच्या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

पश्चिमी सिंहभूम येथील आहे. तर संजय मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत. याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितलं, आरोपी आणि पीडित

महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितलं की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोपात देखील तथ्य आढळलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत होता. आरोपी संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता.

संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचं लैंगिक शोषण करत होता.मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, माझे विरोधक मला निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत.

त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण केलं आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणं हे विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात

आला त्या हॉटेलातील 3 एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावेत. असंही त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!