Thursday, August 11, 2022

बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप नेते शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतात अन्……

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोलचे भाव पन्नास पैसे किंवा एक रुपयाने वाढले तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. आता केंद्रात भाजपची सत्ता असताना इंधनाचे भाव गगनाला भिडले असून महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहे.

अशा महागाईत मते मागण्याचा भाजपला अधिकार नसल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. २६) चिटमोगरा (ता. बिलोली) येथे

झालेल्या सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, भाजप नेते शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करतात आणि शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालतात. दिल्लीच्या सीमेवर नऊ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनातील काही शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले.

त्यामुळे आता भाजपला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. माजी मंत्री रमेश बागवे तसेच दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉ. मीनलताई खतगावकर, अनिरुद्ध बनकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.अशोकरावांच्या पाठीशी राहा शेतकरीहिताची अनेक कामे केल्याने ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे नाव

आजही आदराने घेतले जाते. शेतकरी जगला तरच देश जगेल, हीच संकल्पना हाती घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा जिल्ह्यासह मराठवाड्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतात. अशोकरावाच्या

पाठीशी खंबीरपणे उभे राहून अंतापूरकरांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.सतीश पाटील चिटमोगरेकर यांनी प्रास्ताविक केले

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!