Friday, January 21, 2022

दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर जाणार सोन्याचे दर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:डॉलरच्या कमजोरीमुळे अलीकडच्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीचा परिणामही सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. भारतात कोरोना महामारीनंतर सोन्याच्या आयातीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

त्याचबरोबर स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव वाढत आहेत. जागतिक ट्रेंडचा फायदाही सोन्याला मिळत आहे. शिवाय यूएस ट्रेजरी बाँड्सचे उत्पन्न वाढणे देखील सोन्याच्या किमतीला आधार देत आहे. त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किमतीचा देखील सपोर्ट सोन्याला मिळतो आहे.

सणासुदीच्या काळात सातत्याने होत असलेल्या वाढीमध्ये सोन्याच्या किंमतीत मंगळवारी किरकोळ घसरण झाली होती. 5 रुपये प्रति तोळाने सोन्याचे दर कमी झाले होते. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

तर काल चांदीचे दरही काल 287 रुपयांनी कमी होऊन 64,453 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. या किरकोळ चढउतारानंतर सोन्यात आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला दिवाळीपर्यंत आठवडाभरात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या खरेदीबाबत अशीच तीव्र भावना कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत

सोन्याचा भाव 50,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात तुम्ही सध्याच्या किंमतीवर सोनं खरेदी केल्यास, तुम्ही प्रत्येक 10 ग्रॅमसाठी 2,500 रुपयांपेक्षा जास्त कमावू शकता.कोरोना मुळे पुरवठा साखळीतील बहुतेक वस्तुंमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. या यादीत सोनंही आहे. कॅनडाच्या गोल्ड कॉर्प इंक मध्ये

काम केलेले डेव्हिड गारोफालो आणि रॉब मॅकवेन यांच्या मते, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात. सोन्याची किंमत प्रति औंस $3000 पर्यंत पोहोचू शकते, जी सध्या $1,800 च्या आसपास आहे. त्याच वेळी, मॅकक्वीन असेही म्हणतात की दीर्घकाळात सोने $ 5000 च्या पातळीवर पोहोचेल.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!