Friday, January 21, 2022

पीएम किसान: लाभ घेण्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करा; मिळतील 4000 रुपये

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी लाभ मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान

शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे जमा केले जातात. या योजनेतील 10 वा हप्ता येत्या 15 डिसेंबरला जमा केला जाणार आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की या वेळी शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मिळू शकते.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांत एका हप्त्याचे 2000 रुपये आणि 2000 रुपये जादा असे एकूण 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.  मोदी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण जर तो निर्णय झाला तर शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा फायदा होणार आहे.

 जर तुम्हाला एकूण 4000 रुपयांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत आपलं नाव नोंदवणं आवश्यक आहे.या योजनेत नोंदणी करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2021 ही शेवटची तारीख आहे.  म्हणजे त्यांना 4000 रुपयांचा हप्ता मिळू शकेल. अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत नावच

नोंदवलेलं नाही त्यांनीही आता 31 ऑक्टोबरपूर्वी नाव नोंदवलं तर त्यांना 4000 रुपये म्हणजे दोन हप्त्यांचा लाभ मिळू शकेल. तुम्ही नोंदणी करून या योजनेच्या लाभासाठी केलेला अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात 2000 आणि डिसेंबर महिन्यात 2000 रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे तुमच्या बँक खात्यात थेट 4000 रुपये जमा होतील.

घरबसल्या करा अशी नोंदणी

–Google play store मध्ये जाऊन तुमच्या फोनमध्ये PMKISAN GoI Mobile App डाउनलोड करा.
– ते उघडून NEW FARMER REGISTRATION वर क्लिक करा.

– तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि नंतर Continue बटण दाबा.
– आता रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक अकाउंट डिटेल्स, आयएफएससी कोड योग्य पद्धतीने भरा.
– आता नोंदणी अर्जात नाव, पत्ता, बँक खात्याची माहिती, IFSC कोड ही माहिती भरा.

– नंतर सबमिट बटण दाबा. याचबरोबर तुमची नोंदणी पूर्ण झाली.

– तुम्हाला या योजनेबद्दल काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही या हेल्पलाइन नंबरवर 155261 / 011-24300606 फोन करून ती मिळवू शकता

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!