Thursday, January 20, 2022

आता इंटरनेटशिवाय ही वापरता येईल WhatsApp, जाणून घ्या कसे ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:WhatsApp, टेलिग्राम आदी Apps चा वापर मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आदींशी कनेक्ट राहण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. यात WhatsApp ला युजर्सची विशेष पसंती मिळत आहे. कोणत्याही स्मार्टफोनवरून WhatsApp चा वापर करण्यासाठी इंटरनेटची गरज असते, इंटरनेटविना WhatsApp वापरता येत नाही.

अनेकदा डेटा पॅक संपल्यामुळे किंवा रेंज नसल्यामुळे WhatsApp सह अन्य Apps वापरण्यास अडचणी येतात. मात्र हा प्रश्न आता संपणार आहे. कारण एका ट्रिकद्वारे तुम्ही इंटरनेटविना देखील WhatsApp चा वापर करू शकता. इंटरनेटविना WhatsApp वापरण्यासाठी एक खास सिमकार्ड खरेदी करावं लागेल.

हे सिम कार्ड वापरून तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp अगदी सहजपणे वापरू शकणार आहात.इंटरनेटविना WhatsApp वापरासाठी आता एक खास सिमकार्ड उपलब्ध आहे. चॅटसिम असं या खास सिमकार्डचं नाव आहे. तुमच्या फोनमध्ये सिमकार्ड असलं, तरी हे सिमकार्ड अतिरिक्त खरेदी करावं लागणार आहे.

नेहमीच्या सिमकार्डच्या तुलनेत चॅटसिम या विशेष सिमकार्डची किंमत जास्त असली, तरी त्याचे फायदे अनेक आहेत.चॅटसिम सिमकार्डची किंमत 1800 रुपये असून, त्याची वैधता एक वर्षासाठी असते. तसंच हे सिमकार्ड तुम्ही देशा-परदेशात कुठेही वापरू शकता. विशेष म्हणजे हे सिमकार्ड तुम्ही

ज्या दिवशी खरेदी करता, त्यादिवसापासून एक वर्षापर्यंत याचा वापर तुम्ही करु शकता. त्यानंतर तुम्हाला हे सिमकार्ड रिचार्ज करावं लागेल. तुम्ही चॅटसिमचा वापर सुरू केल्यानंतर WhatsApp वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडणार नाही.चॅटसिम

सिमकार्ड खरेदी करणं अत्यंत सोपं आहे. हे सिमकार्ड तुम्ही ऑनलाइन किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसंच हे सिमकार्ड ऑर्डरदेखील करू शकता. सिमकार्ड मिळाल्यानंतर ते स्मार्टफोनमध्ये इन्सर्ट करणंही खूप सोपं आहे.

चॅटसिममुळे इंटरनेटविना WhatsApp चा वापर शक्य झाल्याने तुम्ही मित्र, कुटुंबियांसोबत अगदी सातत्यानं कनेक्ट राहू शकता.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!