Thursday, January 20, 2022

नरेंद्र मोदींच्या दाढीप्रमाणे महागाई वाढत आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकार टीका करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी महागाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी वाढत्या महागाईची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली. राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ बुरहानपुरला पोहोचले होते, यावेळी ते बोलत होते. कमलनाथ म्हणाले, “जे दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, पेट्रोल आणि डिझेलचे

भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत.कमलनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर देखील निशाणा साधला.

कमलनाथ म्हणाले की, “शिवराजजींबद्दल मी सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहे की, ते चांगले अभिनेते आहेत, चांगले कलाकार आहेत. त्यांना कलेची चांगली जाण आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात.

दरम्यान पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ४ मे २०२० पासून सातत्याने वाढत असणाऱ्या ऑटो इंधनाच्या किमतींमुळे पेट्रोल प्रति लिटर अंदाजे ३६.३५ रुपये आणि डिझेल सुमारे २९ रुपयांनी महागले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ झाल्याने

सरकारवर कर कमी करण्याचा दबाव येऊ शकतो, ज्यामुळे महसूल आणि खर्चावर विपरित परिणाम होऊ शकतो.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!