माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांची टीका करताना पुन्हा जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतीशय खालच्या भाषेत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की
व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षाचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल? वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है! असे ट्विट तुषार भोसले यांनी केलं आहे.
दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांनी काही पुराव्यानिशी समीर वानखेडे आणि त्यांची कारवाई कशी खोटी आहे हे दाखवले होते. परंतु समीर वानखेडेंनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यानंतरही अनेक आरोप पुराव्यानिशी मलिक करत आहेत. समीर वानखेडेंनी विशेष NDPS कोर्टात जाऊन साक्ष दिली आणि आपण चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. वानखेडे काल सकाळी दिल्लीला दाखल झाले आहेत.
आर्यन खान प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. पंत म्हणून नेमण्यात आलेल्या प्रभाकर साईल खळबळजनक आरोप केले आहेत. त्याचबरोबर या कारवाईतील मुख्य पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे किरण गोसावी फरार आहे. आज सकाळीही नवाब मलिकांनी समीर
वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सर्वांसमोर मांडला होता. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एनसीबीने नवी मुंबईमध्ये केलेल्या कारवाईबाबतही पंचांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.