Monday, July 4, 2022

‘जलयुक्त शिवार’प्रकरणी क्लीन चिट नाहीच

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:  भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार गैरव्यवहार प्रकरणात कुणालाही क्लीनचिट देण्यात आलेली नसल्याचा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. काहीजण या प्रकरणात क्लीनचिट दिल्याचा दावा करत असले

तरी ही धादांत खोटी माहिती असून या प्रकरणाची चौकशीदेखील अद्याप पूर्ण झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रकरणाची सध्या राज्य सरकार चौकशी करत असून ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या गोटातून या प्रकरणी क्लीनचिट मिळाल्याची खोटी माहिती पसरवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात जर

चौकशीच पूर्ण झाली नसेल, तर क्लीनचिट देण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे.जलयुक्त शिवार प्रकरणात क्लीनचिट मिळाल्याची अफवा पसरल्यानंतर जलसंपदा विभागानं पत्रक काढत त्याबाबत खुलासा केला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या 71 टक्के कामांत

गैरव्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आर्थिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!