Monday, July 4, 2022

मोठा धोका:दिवाळीमध्ये पुन्हा पावसाचा इशारा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पुन्हा दिवाळीमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. पुर्वमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणी होताच पाऊस झाला

तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती. अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत त्यामुळे

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यंदा रब्बी हंगामाला पोषक वातावरण असल्याने शेतकरी पुर्वमशागत आणि पेरणीच्या तयारीला लागला आहे. असे असतानाच हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा पावसाचे

संकेत दिले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.आगामी महिन्यातील 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, श्रीलंकेपासून 250 किमी अंतरावर चक्रीवादळ तयार होत आहे. त्या वादळामुळे देशातील सहा राज्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी होण्याच्या आगोदरच नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे.सोयाबीन हे सुरक्षित ठिकाणी ठेवणे

आवश्यक आहे तर कापसाच्या वेचणीची कामेही सुरु आहेत. यवतमाळसह महाराष्ट्रात कापूस वेचणी सुरु आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी एक वेचणी करुन घेणे गरजेचे आहे अन्यथा कापसाच्या बोंडाचे नुकसान होईल.सध्या पावसाने उघडीप दिल्याने हलक्या प्रतीच्या जमिनक्षेत्रावर वाफसा म्हणजे ते क्षेत्र हे पेरणीलायक झाले आहे.

अशा क्षेत्रावर यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास वेळेची बचत होणार आहे. अन्यथा खरीपात पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या तर आता पावसामुळे रब्बीच्या पेरण्या ह्य लाबंणीवर पडणार आहेत. आगोदरच गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे एका महिन्याचा उशिर झाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाच अंदाज घेऊन पेरणी कामे उरकून घेण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

देवगड येथील श्री समर्थ सदगुरू श्रीकिसनगिरीबाबांच्या नगर प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पंढरपूरमध्ये काढण्यात आलेल्या श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुका पालखी दिंडीचे...

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...
error: Content is protected !!