Monday, July 4, 2022

पवार साहेब या अतिरिक्त उसाचे करायचे काय?नगर जिल्ह्यातील या नेत्यांचे शरद पवारांना साकडे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होऊन काही उरतही आहे. आता लगेचच त्याचे परिणाम दिसणार नसले, तरी हंगाम अर्ध्यात आल्यानंतर अतिरिक्त उसाचे काय करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होणार आहे.

त्यावेळचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार, हे कारखान्यांच्या प्रशासनाने सांगावे आणि त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.

अतिरिक्त ऊसप्रश्नी शरद पवार यांना वस्तुस्थितीदर्शक निवेदन पाठविण्यात आले असल्याचे सांगून दहातोंडे म्हणाले, की नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी एक लाख 30 हजार हेक्टरवरील उसाचे गाळप झाले. यंदा एक लाख 85 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर

गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे. हंगामात गाळप वाढणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये एक कोटी 11 लाख 18 हजार टन उसाचे गाळप झाले. त्या तुलनेत यंदा 40 लाख टनाने गाळप वाढणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी व यंदाही पाऊस चांगला झाल्याने उसाच्या लागवडी वाढल्या आहेत. विशेषतः नेवासे, राहुरी

तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखान्यांनी क्षमतेनुसार अपेक्षित उसाच्या नोंदी केल्या असल्या, तरी अनेक कारखान्यांनी उसाच्या नोंदीच घेतल्या नाहीत. त्यामुळे नोंदी नसलेल्या उसाचे गाळप कसे करायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नेवासे तालुक्यात

सर्वाधिक ऊस लागवड आलेली आहे. त्यामुळे येथील अतिरिक्त उसाचे काय करायचे, असा प्रश्न भेडसावणार आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष घातले, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न कसा सोडवणार, याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही नियोजन केल्याचे दिसत नाही.

आता साखर कारखाने सुरू झाले आहेत. अतिरिक्त उसाबाबत आज कोणी बोलत नसले, तरी महिना-दोन महिन्यांनी हा प्रश्न चव्हाट्यावर येणार आहे. त्यावेळी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाबाबत साखर आयुक्त, साखर कारखाने यांनी

 आताच नियोजन करणे गरजेचे आहे. – संभाजी दहातोंडे, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!