Tuesday, January 18, 2022

फेसबुकने नाव बदललं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता हे नाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते.

जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स,

नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे.

मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे. पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत.

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!