माय महाराष्ट्र न्यूज:आता कोरोना व्हायरसवर कॅप्सूलनं उपचार केले जाणार आहेत. याच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. औषध निर्माता ऑप्टिमस फार्मा नं गुरुवारी सांगितलं की, त्यांनी भारतात कोरोना
व्हायरसच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलची तिसऱ्या फेज क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.सल्लागार समितीची 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. ज्यामध्ये मर्क आणि रिजबॅकच्या सौम्य ते मध्यम कोविड संसर्गाच्या उपचारांसाठी
मोलनुपिरावीरच्या आपत्कालीन मंजुरीसाठी केलेल्या विनंतीचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे, उपचार घेत असलेल्या लोकांमध्ये अभ्यासाच्या 10 व्या दिवशी 91.5 टक्के आरटी-पीसीआर निगेटिव्ह नोंदवण्यात आले आहेत.
ऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले, कोविड-19 साठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणं आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणं हे आमचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय परवाना प्राधिकरणासमोर फेज 3 क्लिनिकल चाचण्या सादर करणारी Optimus ही पहिली फार्मा कंपनी आहे. देशातील 29 वेगवेगळ्या ठिकाणी या औषधाचा अभ्यास करण्यात आला. Covishield, Covaccine आणि Sputnik लस सध्या
भारतात वापरली जात आहे. DCGI आणि SEC ने आतापर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, स्पुतनिक V आणि Zydus Cadila च्या लसींना परवानगी दिली आहे.