Monday, July 4, 2022

नगर – मनमाड महामार्गाचे काम पंधरा दिवसांत सुरू: नितीन गडकरी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी  यांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था लवकरच दूर होणार असून येत्या 15 दिवसांत रस्ता बांधकामाला सुरुवात करून एक वर्षात ्तो दर्जेदारपणे पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत व्यक्त केला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे खा. सुजय विखे पाटील यांनी स्वतः गाडी चालवत ना. गडकरी यांना राहुरी ते शिर्डी या दरम्यान नगर-मनमाड रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली. त्यानंतर

लगेचच ना. गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची घोषणा केली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिर्डीत ना. गडकरींचे जल्लोषात स्वागत केले. दिवाळीपूर्वी साईबाबांचे दर्शन मिळाल्याचा् आनंद असून देशवाशी कोव्हीडच्या संकटातून मुक्त होवोत

अशी प्रार्थना साईचरणी केल्याचे सांगत गडकरींनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.ना.नितीन गडकरी यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.

याप्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.अनेक वर्षांपासून नगर – मनमाड महामार्गाची मोठी ्दुरवस्था झाली असून हा राज्यमहामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे. मात्र 490 कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही रस्त्याचे काम अद्यापही सुरू होत

नसल्याबाबत प्रसारमाध्यमांनी मंत्री गडकरी यांना विचारले असता नगर – मनमाड महामार्गाचे कामाचा आढावा घेतला असून येत्या 15 दिवसात रस्ता बांधकामाला सुरुवात करून एक वर्षात ्तो दर्जेदार रित्या पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अनेक दिवसांपासूनया रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत आहेत. ना. गडकरी यांच्या प्रतिक्रियेने या महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!