माय महाराष्ट्र न्यूज:कृषि उत्पन्न बाजार समिती अहमदनगरकडून सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, बाजार समितीचे उपबाजार नेप्ती या ठिकाणी होणारे कांदा लिलाव सोमवार दिनांक ०१/११/२०२१ व गुरुवार दिनांक ०४/११/२०२१ रोजी दिपावली
या सणा निमित्त बंद ‘ राहीतील. या बंद बाबत अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशन यांनी दिनांक २६/१०/२०२१ रोजी बाजार समितीस पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सोमवार दिनांक ०१/११/२०२१ व गुरुवार दिनांक ०४/११/२०२१ रोजी
समितीचे नेप्ती उपबाजार आवारामध्ये कांदा या शेतीमालाचे लिलाव होणार नाहीत. तसेच शनिवार दिनांक ०६/११/२०२१ रोजी पासून कांदा मार्केट नियमित चालू राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.