Monday, July 4, 2022

चंद्रकांत पाटील म्हणाले काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत पण राष्ट्रवादी काँग्रेस…  

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण.

एकवेळ काँग्रेस परडवली. काँग्रेसमधील सर्व व्यक्तीमत्व वेल कल्चर असतात. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीनं सलगी करणं याला राष्ट्रवादी कधीचं भूलणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत करत असलेल्या डावाला भाजप फसणार नाही.

राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

दरम्यान, प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. गुरुवारी बैठकीत तोडगा निघाला असं सांगितलं होतं मात्र अनेक ठिकाणी आजही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृती समिती शासनासोबत डील करतेय, असा

आरोप करत आंदोलन पुकारण्यात आलं आहे. गुरुवारी एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आला, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली. मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या.

तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं होतं. तरीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!