Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठी बातमी: माजी आमदार मुरकुटे लढवणार लोकसभा ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची गणिते डोळ्या समोर ठेवून राजकीय खेळ्या सुरू झाल्या आहेत.

जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्याच्या यंदाच्या गाळप हंगामाच्या प्रारंभ सोहळ्यात मंगळवारी माजी आमदार भानुदास मुरकुटेंनी चांगली राजकीय फटकेबाजी केली.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नवीनच डाव खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याची चर्चा आज अहमदनगर जिल्ह्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मुरकुटे म्हणाले, जेष्ठनेते शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आपण व्यक्त केली. अहमदनगरमधून निवडणुकीची आपली तयारी आहेत. त्यासाठी पक्षाने वयाचा कुठलाही निकष लावला, तरीही काळजी करु नये, असे त्यांना सांगितले.

कारण वयाच्या 80 व्या वर्षी देखील आपण तंदुरुस्त आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुण उमेदवारांसोबत दोन किलोमीटर अंतर चालविण्याची स्पर्धा घ्यावी, त्यात निश्चितच तरुणांपेक्षा आपण सरस ठरणार असल्याने आपली उमेदवारी करण्याची तयारी आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आपले राजकीय वजन आहे. आमदार नसलो, तरी देखील मंत्रिमंडळातील अनेक सहकारी हे जुने मित्र राहिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठनेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहे.

त्यामुळे कुठलेही राजकीय कामास अडचण येत नसल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!