माय महाराष्ट्र न्यूज:नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सर्वात मोठा सण आहे. याशिवाय देशातील अनेक भागात छठ पूजा, गोवर्धन पूजा, गुरुनानक जयंती आणि इतर सण देखील साजरे होतात. यामुळे देशातील अनेक भागात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून त्यानुसार १७ दिवस बँका बंद राहणार आहेत. १ नोव्हेंबर : कन्नड राज्योत्सव/कुटमुळे बेंगळुरू आणि इंफाळमधील बँका बंद राहणार आहेत.२ नोव्हेंबर – नरक चतुर्दशीमुळे
बंगळुरूमधील बँका बंद असतील.४ नोव्हेंबर – अगरतळ, बंगळूरू, अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनौ या शहरात दिवाळी आणि लक्ष्मीपूजनामुळे बँका बंद असतील.
५ नोव्हेंबर – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक आणि डेहराडून शहरातील बँका गोवर्धन पुजेमुळे बंद असतील.६ नोव्हेंबर – गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनौ येथील बँका भाऊबीजेमुळे बंद राहतील.७ नोव्हेंबर – या दिवशी रविवार असल्याने नेहमीप्रमाणे बँका बंद असतील.
१० नोव्हेंबर – पटना आणि रांचीमधील बँका छठपुजेसाठी बंद११ नोव्हेंबर – पाटण्यात छठपूजेमुळे बँक बंद राहणार आहे.१२ नोव्हेंबर – शिलाँगमध्ये त्या दिवशी वंगाळा सण साजरा केला जाणार आहे, त्यामुळे बँका बंद आहेत.१३ आणि १४ – नोव्हेंबर – शनिवार आणि रविवार१९ नोव्हेंबर – बेलापूर, भोपाळ,
चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, रांची, शिमला, श्रीनगर, नवी दिल्ली याठिकाणी गुरुनानक जयंतीमुळे बँका बंद राहणार आहेत.२१ नोव्हेंबर – रविवार२२ नोव्हेंबर – कनकदास जयंतीमुळे बंगळुरूमध्ये बँक बंद होतील.
२३ नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेममुळे शिलाँगमधील बँका बंद राहतील.२७ आणि २८ नोव्हेंबर – शनिवार आणि रविवार.