माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरचे पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मात्र भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद सोडत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.काही दिवसांपूर्वी मुश्रीफ म्हणाले, की आगामी काळात नगर व कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. विधान परिषदेसह
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर महानगरपालिका, नऊ नगरपालिका यांसह इतरही निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर एका मंत्र्याला अशा स्थितीत दोन जिल्ह्यांकडे लक्ष देणे अवघड असल्याने, तसेच होम ग्राउंड म्हणून कोल्हापूरकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बदलण्याच्या हालचाली आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न सोडविण्यासाठी नगरचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी राज्य ऊसतोडणी कामगार मुकादम युनियनचे
अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी केली. या बाबत माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.नगर व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतील कामाचा ताण अधिक होत आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे
नवीन पाकलमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. हे मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होत असले, तरी त्यांच्या गावी अनेक समस्या आहेत. या समस्या अजित पवार सोडवू शकतात. या शिवाय
त्यांना ग्रामीण भागातील अनेक बाबींची जाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील. त्यामुळे नगरचे पालकमंत्रिपद पवार यांना द्यावे, अशी मागणी आहे.