सोनई
अशोका ज्ञानदीप ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निमित्त आरोग्य,शिक्षण व स्वच्छता विभागात विशेष कार्य केल्याबद्दल कोवीड योध्दा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संदीप कुसळकर यांनी प्रास्ताविक केले.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर,आरोग्य सेविका,गावातील खाजगी डाॅक्टर, आशा सेविका,ग्रामपंचायत सफाई कर्मचारी व कोरोना काळात सेवाकार्य केलेल्यांचा स्मृतीचिन्ह देवून पुरस्कार देण्यात आला.कोवीड योध्दा पुरस्कार देवून पुण्यस्मरण कार्यक्रम केल्याबद्दल कुसळकर परीवाराचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमास डाॅ.बडाख, डाॅ.प्रेमसुख चंगेडिया, पत्रकार विनायक दरंदले,माजी पंचायत समिती सदस्य बापुसाहेब बारगळ,संदीप अट्टल राजेंद्र क्षीरसागर,अनिल निमसे,संदीप दरंदले उपस्थित होते.मार्गदर्शक अशोक कुसळकर, संदीप कुसळकर, गणेश,गंगाराम जगदिश,सागर कुसळकर यांनी पुरस्काराचे वितरण केले.माजी उपसरपंच नंदीनी कुसळकर, अंजली, रेश्मा, कल्पना व मोनिका कुसळकर यांनी महिलांचे पुरस्कार दिले.सुभाष राख यांनी सुत्रसंचालन केले.आभार भगवान कुसळकर यांनी मानले.