Thursday, January 20, 2022

अखेर शासन निर्णय जारी;राज्यातील साखर कामगारांच्या 12 टक्के वेतनवाढीचा मार्ग मोकळा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

शासन प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी व कामगार संघटना प्रतिनिधींचा समावेश असलेल्या त्रिपक्षीय समितीच्या सामंजस्य करारानुसार राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याबाबतचा शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केल्याने वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाल्याने साखर कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी दि.12 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती.त्यानंतर समितीच्या काही बैठक होऊन ही वेतनवाढ देण्याबाबत कारखाना प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांच्या एकमत न झाल्याने शेवटी माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांना याबाबद निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते.त्यानुसार दि.9 सप्टेंबर 2021 रोजी खा.शरद पवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ द्यावी असे सुचवले होते.त्यानुसार दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी हजेरी पत्रकावर ववेतनश्रेणीत पगार घेत असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून 12 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे.

याबाबतचा शासन निर्णय दि.29 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयान्वये दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत 12 टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या 12 टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रूपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम-1983 अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार / कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे.उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना/हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी 26 रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा 308 रूपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून कामगार कामावर असतांना अपघात होऊन मयत झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास एका वारसाला कामावर घेण्याचे अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त नोकरीच्या कालावधी प्रमाणे एकाच कारखान्यात 6 वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 1 जादा वेतवाढ,14 वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 2 जादा वेतवाढ,21वर्षे सलग नोकरी झालेल्या कामगाराला 3 जादा वेतवाढ मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी, खाजगी, भाडेतत्वावर व सहभागीदारी तत्वावर असणा-या सर्व कारखान्यांना या कराराच्या सेवाशर्तीची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील, अशी त्रिपक्षिय समितीने शिफारस केली आहे. तसेच, यासंदर्भात त्रिपक्षिय समितीने राज्यपातळीवर संबंधित मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांचेसोबत वरील शिफारशीच्या अनुषंगाने दि.4 ऑक्टोबर 2021 रोजी करारं केलेला आहे.सदर करार 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024 या पाच वर्षांसाठी लागू असणार आहे.

शासन निर्णय निघाला असला तरी ही शासननिर्णय निघाल्यानंतरच्या कोणत्या महिन्यापासून 12 टक्के वेतनवाढ लागू करायची आणि तिथं पर्यंतच्या फरकाची रक्कम कधी द्यायची याचा निर्णय मात्र त्या त्या कारखान्याचे व्यवस्थापनाने स्थानिक प्रतिनिधीक कामगार संघटनेशी करार करावयाचा आहे.

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचे निर्णयाचे श्रेय जेष्ठ खा.शरद पवार,समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक,सरचिटणीस नितीन पवार,महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,कार्याध्यक्ष अविनाश आपटे व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे चिटणीस कॉ.आनंद वायकर यांचेसह राज्यस्तरीय साखर कामगार संघटनांच्या इतर प्रतिनिधींना आहे अशी प्रतिक्रिया राज्य साखर कामगार फेडरेशनचे उपाध्यक्ष रामनाथ गरड,खनिजदार डी. एम.निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, नेवासा तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी दिली.

*अशी असेल निर्धारीत वाढ…*
————————————————————————–
अ.नं.– वर्गवारी–निर्धारित वेतनवाढ रुपये–धुलाई भत्ता रुपये
—————————————————————————
1) अकुशल –2132–167
2) निमकुशल–2146–176
3) कुशल-ब –2168–262
4) कुशल-अ–2192–206
5) अतिकुशल–2215–297
6) कारकून(4)–2167–262
7) कारकून (3)–2191–206
8) कारकून (2)–2215–302
9) कारकून(1)–2239–213
10)सुपरवायझरी(सी)–2239–208
11)सुपरवायझरी(बी)–2263–317
12) सुपरवायझरी(ए)–2311–204
———————————————-

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!