नेवासा
वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार शेतीपंपाची तसेच पाणीपुरवठा आणि दिवाबतीची कोणतीही वीजजोडणी खंडित न करण्याचे आदेश दि. ०६ नोव्हेंबर २०२१ पर्यन्त असल्याने कोणतीही वीजजोडणी खंडित करण्याची कार्यवाही नेवासा उपविभाग महावितरण अंतर्गत स्थगित करण्यात आलेले आहे असे लेखीपत्र महावितरण कंपनीने दिल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने करण्यात येणार दि.1 नोव्हेंबर चा रास्तारोको आंदोलन स्थगित करणेत आल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिली.
अधिक माहिती देताना श्री.पोटे म्हणाले,शेतकऱ्यावर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटानंतर महावितरणने शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे नवीन संकटात टाकले. शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्याची वेळ असताना अचानक महावितरणने शेतकऱ्यांची वीज कापली. हे समजताच प्रहारचे कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यालय ताब्यात घेतले होते. पोलीस प्रशासन आणि राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आठ वाजता ऑफिस सोडले व दुसऱ्या दिवशी चर्चा झाली असता महावितरणचा बोजा प्रचंड असल्याने आम्हाला या निर्णय शिवाय पर्याय नाही असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्या चर्चेमध्ये तोडगा न निघाल्याने जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांनी तात्काळ शेतकऱ्यांची बाजू घेऊन रास्तारोकोचा निर्णय घेतला होता तसे निवेदन शेतकऱ्या समवेत गुराढोरांसह आम्ही राजमुद्रा चौकात दि.1 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करणार असल्याचे त्यांनी निवेदन दिले होते. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले प्रशासन यामुळे जागे झाले तात्काळ उपकार्यकारी अभियंत यांनी प्रत्यक्ष भेंडा येथे येवून पत्र दिले की दि.7 नोव्हेंबर पर्यंत कोणाचीही वीज कापली जाणार नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन हे तात्पुरते स्थगित ठेवून होत आहोत.
यावेळी प्रहारचे जिल्हा सल्लागार एड. पांडुरंग औताडे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, बाळासाहेब खर्जुले, प्रहार धरणग्रस्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बंडू सातपुते, प्रहार किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, कार्याध्यक्ष अनिल विधाटे, उपाध्यक्ष नागनाथ आगळे व शेतकरी प्रतिनिधी अप्पासाहेब निकम ,राजेंद्र चामुटे, बंडू भाऊ आरगडे आदी शेतकरी उपस्थित होते.
*पुन्हा रस्त्यावर उतरू-पोटे..*
दि.6 नोव्हेंबर पर्यंत स्थगिती दिली असली तर ही दि.7 नंतर लाईट कट करायला सुरुवात झाली तर आम्ही शंभर टक्के रस्त्यावर उतरून तालुका नाहीतर जिल्हा व्यापी आंदोलन करू.
–अभिजित पोटे,जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
*शेतीपंप ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा…*
वीजजोडणी धोरण २०२० नुसार शेतीपंप ग्राहकांसाठी भरघोस सवलत असल्यामुळे आपण शेतीपंप ग्राहकाना विजबिल भरण्याचे आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा.
–शरद चेचर
उप कार्यकारी अभियंता, नेवासा उपविभाग