Thursday, January 20, 2022

सावधान!या फोनमध्ये हे Wallpaper चुकूनही ठेवू नका अन्यथा मोठं नुकसान…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:Netflix वरील Squid Game सीरिज अतिशय पॉप्युलर ठरत आहे. या सीरिजची क्रेझ इतकी वाढली, की अनेकजण आपल्या स्मार्टफोनवर याचे वॉलपेपर ठेवत आहेत. तुम्हीही अशाप्रकारे वॉलपेपर ठेवला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आवडत्या Squid Game चे वॉलपेपर ठेवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सायबर क्रिमिनल्सने Google Play Store वर Squid Game phone wallpaper App रुपात मालवेअर तयार करण्यात यश मिळवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

अँड्रॉईड सिक्योरिटी रिसर्चरद्वारा ट्विटरवर @ReBensk या हँडलवरुन हे App शोधण्यात आलं. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, महत्त्वाची बाब म्हणजे Google कडून या धोकादायक App चा शोध लागण्याआधीच Squid Game phone Wallpaper 4K HD App कमीत-कमी 5000 वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

कंपनीकडून Google Play Store वर हे फेक App ब्लॉक करण्यात आलं आहे. Squid Game सीरिज फॅन्ससाठी हे वॉलपेपर App तयार करण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर Squid Game संबंधी इतरही अनेक Android App तयार झाल्याची माहिती आहे.

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट Squid Game च्या धोकादायक Wallpaper App मध्ये Android Joker मालवेअर आढळल्याची माहिती आहे. जोकर नावाचा मालवेअर धोकादायक असून हा मालवेअर 2017 मध्ये सर्वात आधी शोधण्यात आला होता.

सध्या नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम्स सीरिज अतिशय लोकप्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Play Store वर 200 हून अधिक स्क्विड गेम्स संबंधित Apps आहेत. हे Apps अधिकृत नसूनही 10 दिवसांत तब्बल 1 मिलियनहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!