Monday, July 4, 2022

नगर ब्रेकिंग: आठ महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या जयश्री विक्रम गुंजाळ (वय-२१) या मुखेड येथील नवविवाहित तरुणीचे केवळ आठ महिन्यात शव त्यांच्या नजीकच्या स्वतःच्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेचे पिता बाबासाहेब नथु आहेर (वय-५८) रा.प्रवरानगर यांनी या बाबत पोलिसात हुंड्यासाठी आपल्या मुलीचा बळी घेतला असावा असा संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे.व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान सदर तरुणी हि किराणा व्यावसायिक नवरा विक्रम गुंजाळ यांस मदत करत होती.काल दिवसभर ते दोघे बरोबर होते.मात्र काल सायंकाळी तिने आपल्या भावाला एक लघु संदेश पाठवला होता.व त्यात तिने आपल्या भावाला लिहिलेल्या संदेशात नवरा,सासू,व सासरा या तिघांना सोडू नका असा संदेश पाठवला होता

अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.माहेराहून पाच तोळे सोने आणावे या हुंड्याच्या कारणावरून बेबनाव होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे.यातून या महिलेने हे पाऊल उचलले असावे असे समजते.सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत नवं विवाहित तरुणी जयश्री गुंजाळ रा.मुखेड वडील नोकरी निमित्त

प्रवरा नगर येथे आहेत.हिचे लग्न आठ महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील किराणा व्यावसायिक विक्रम गुंजाळ याचेशी झाला होता.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर दोघांत काही माहेराहून पाच तोळे सोने आणावे या कारणावरून घरात नवरा,सासू,सासरे यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या.

दरम्यान आज सकाळी संबधीत महिला गायब झलयावर प्रथम कोपरगाव तालुका पोलिसांना व मयत तरुणीच्या नातेवाईकांना याची खबर दिली होती.नातेवाईक आल्यावर वातावरण चिघळण्यास प्रारंभ झाल्यावर हि सर्व मंडळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ती सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घराच्या ती सौचास जाते म्हणून बाहेर पडली होती.त्या नंतर सकाळी घरातील नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला असता ती विहिरीत मिळून आली नाही.मात्र वस्तीनजीक साधारण ५०० फुटावर असलेल्या ग.क्रं.४९ मध्ये ते शोधण्यास गेले असता त्या विहिरीजवळ असलेल्या

झाडावर तिने बरोबर नेलेली विजेरी दिसून आली त्यातून ती त्या संशयावरून ती त्याच विहिरीत असावी असा तीच्या घरच्यांचा संशय बळावला होता.त्या ठिकाणी शोध घेतला असता ती त्या विहिरीत मिळून आली आहे.नजीकचे नागरिक व भाऊ,वडील,काका आदी नातेवाईकांना महिलेचे शव नजीकच्या विहिरीत आढळून आले होते.तिला गळाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान सदर तरुणी हि किराणा व्यावसायिक नवरा विक्रम गुंजाळ यांस मदत करत होती.काल दिवसभर दिवाळीची किराणा ग्राहकांची गर्दी असल्याने गडबड असल्याने ते दोघे बरोबर होते.मात्र काळ सायंकाळी तिने आपल्या भावाला एक लघु संदेश पाठवला होता.व त्यात तिने आपल्या भावाला लिहिलेल्या संदेशात

नवरा,सासू,व सासरा या तिघांना सोडू नका असा संदेश पाठवला होता अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र सासू व नवरा यांच्यात माहेराहून पाच तोळे सोने आणावे,लग्न साधेपणाने केले,संसारोपयोगी साहित्य दिले नाही,या कारणावरून शारीरिक,मानसिक छळ केलाच होता.त्यातून हि घटना घडून आली आहे.

अशी फिर्यादी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्याला पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुजोरा दिला आहे.घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलिस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे विरुद्ध गु.र.क्रं.३७३/२०२१ हुंडा बळी कलम ३०४ (ब),४९८(अ),५०४,३४ प्रमाणे केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!