माय महाराष्ट्र न्यूज:गांधीनगर येथील एका 23 वर्षीय तरुणीने कथितपणे गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. रिपोर्ट्सनुसार, तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार आपले सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय या मुलीने गुजरातमधील गांधीनगर येथील एका कॉलेजमधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सोमवारी ती आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ज्यावेळी तिने हे पाऊल उचललं
त्यावेळी घरात ती एकटीच होती. तर तिचे वडील चुलत बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते.या घटनेप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती न देताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. कुटुंबाची बदनामी होईल असे वाटत असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी तरुणीचे वडील तिची डायरी, मोबाइल फोन आणि बॅग तपासत होते त्यावेळी डायरीत जे काही लिहिलं होतं ते वाचून त्यांना धक्काच बसला.
वाचा : आधी पार्टी केली मग मित्रावर 40 मिनिटांत केले 107 वार, प्रायव्हेट पार्ट कापून डोळाही काढला
डायरीत तरुणीने लिहिले होते की, गांधीनगर येथील नारदीपूर गावात राहणारा रुशी आपल्या मित्रांसोबत मिळून सेक्स चॅट व्हायरल करण्याची धमकी देत होता. तिने रुशी सोबतचे नाते तोडले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, आरोपी रुशी हा पुन्हा तरुणीसोबत नाते ठेवण्यास उत्सुक होता
मात्र, त्या तरुणीने त्याला नकार दिला होता. लोकमत न्यूज डॉट इनने या संदर्भात वृत्त दिलं आहे.तिने आपल्या डायरीत पुढे हिलिले होते की, आमच्यात झालेले चॅट व्हायरल करण्याची रुशी वारंवार धमकी देत होता आणि या सर्वांना वैतागून मी आत्महत्या करत आहे.
माझ्या आत्महत्येला तोच जबाबदार आहे. त्याच्यामुळेच मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.