Saturday, January 22, 2022

तरवडी गाव हे प्रबोधनाचे पॉवर हाऊस-डॉ.सदानंद मोरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

‘दीनमित्र’ या साप्ताहिकाने आपल्या वैचारिक लेखनातून तत्कालीन सर्व प्रश्न निर्भिडपणे मांडले. ‘दीनमित्र’ हे इतिहास घडविणारे पत्र होते. तरवडी गाव हे प्रबोधनाचे एक पॉवर हाऊस आहे, त्या पॉवरमधून निघणाऱ्या होल्टेजचे अनेकांना धक्के बसले. या पॉवर हाऊस मधील असणाऱ्या इंधनातुन कशी वीज निर्माण करायची व ती समाजात कशी खेळवून समाज प्रबोधन कसे करावे हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या नायगाव,ता.पैठण येथील ज्येष्ठ साहित्यीक गणपत अंबादास उगले लिखित सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील (जीवन कार्य आणि लेखन समीक्षा) या ग्रंथाचे प्रकाशन डॉ.मोरे यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रल्हाद लुलेकर, प्रा.डॉ. सुधाकर शेलार, अक्षर वाड्मय प्रकाशनचे बाळासाहेब घोंगडे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, डॉ.अशोक ढगे, कॉ. बाबा आरगडे , प्रा. महेबुब सय्यद, साहित्यिक संजय कळमकर , प्राचार्य विश्वासराव काळे हे व्यासपीठावर होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डॉ. सुधाकर शेलार यांनी ग्रंथ निर्मीतीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की , एकुण एकसष्ट लोक एकत्रीत येऊन त्यांच्या देणगीतुन या ग्रंथाची निर्मीती झाली. या ग्रंथाच्या प्रती लोकांना भेट देवुन वाचन संस्कृती चळवळ वृद्धीगत करावी.

या ग्रंथाचे लेखक जी. ए. उगले यांनी सांगितले की, या संशोधनात्मक चरीत्रातुन अनेक तथ्ये मांडले आहेत. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या चरित्रातील अनेक जन्म बाबीवर प्रकाश टाकला आहे.

प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सांगितले की , मुकुंदराव समजुन घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. सत्यशोधक समाजाला गती देण्याचे काम मुकुंदराव पाटीलांनी केले. त्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा ग्रंथ वाचकांपर्यंत पोहण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाने करावा.
यावेळी अध्यक्ष मा.आ.पाडुरंग अभंग म्हणाले समाजाला भरकटू द्यायचे नसेल तर त्याचे प्रबोधन केले पाहिजे. त्यासाठी विचारवतांनी योगदान दिले पाहिजे.

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी प्राचार्य दादासाहेब वाबळे, सरपंच जालिंदर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर, नांदुर शिकारीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रख्माजी लिपणे,डॉ. प्रा. संतोष तागड, रामकृष्ण नवले, माजी सरपंच बाबासाहेब घुले, प्रा.डॉ. संजय दरवडे, शंकर भारस्कर, मनोहर बोराटे, शिवाजी महाशिकारे, कैलास म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ. प्रा. शिरीष लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे सचिव उत्तमराव पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रा. सुनिल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!