Tuesday, January 18, 2022

खा मुंडेंचे मोठे विधान नगर जिल्ह्यातील या तालुक्याचा समावेश बीड मतदारसंघात झाला असता तर अधिक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन बीडच्या खासदार प्रतिम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,

तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, अशोक गर्जे, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव खेडकर, विजय गोल्हार उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, पाथर्डी तालुक्यास दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे मावशी म्हणत. त्या नात्याने पाथर्डी माझी आजी आहे.

तुमच्याकडून मला काकणभर जास्त मायेची गरज आहे. तुमचे आशीर्वाद मला मतदानातून मिळत नाही, ही खंत आहे. या तालुक्याचा समावेश जर बीड लोकसभा मतदारसंघात झाला असता, तर मला अधिक आनंद झाला असता.  मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधीच नव्हते,

त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. माझ्या दृष्टीने तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे असल्याची भावना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानाने कसे जगायचे, याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.

राजकारणात आपण अपार कष्ट घेणार असून, ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है, असे खासदार प्रीतम मुंडे शेवटी म्हणाल्या.बीड जिल्हा राजकारणात सर्वांना पुरून उरणारा जिल्हा आहे, आपला देश कृषिप्रधान देश असला तरीही बीड जिल्ह्यात

राजकारण हा पहिला, पत्रकारिता हा दुसरा तर सल्ला देणे हा तिसरा धंदा असून येथे सल्ले चांगले मिळत असून हा जिल्हा माझ्यासाठी खासच आहे असे मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!