माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रामडोह येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेवर चार जणांनी दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आरोपींनी पीडित विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर अत्याचारासाचा कळस गाठला आहे. आरोपींनी दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडितेनं नेवासा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी सामूहिक
बलात्कारासह धमकी आणि अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल केला आहे. संतोष अप्पासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेष काकासाहेब गोरे आणि संदीप गोरख आगळे अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.
फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, तीन महिन्यापूर्वी पीडित विवाहित महिलेचे पती, मुली आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान पीडित महिला घरी एकट्याच होत्या. विवाहितेला घरी एकटं पाहून संबंधित चार आरोपी जबरदस्ती करत तिच्या घरात शिरले.
आरोपींनी पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तसेच आरोपींनी घटनेची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेनं आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन केला.
दरम्यान पीडित महिला आपल्या माहेरी गेली असता, आरोपींनी तिला फोन करून धमकी दिली होती. त्यामुळे संबंधित प्रकार पीडित महिलेच्या घरी देखील समजला होता.यानंतर, आठ दिवसांपूर्वी पीडित महिला शेतात एकटी झोपली असताना
आरोपींनी पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनं नराधम आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित चारही आरोपीविरोधात सामूहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी,
ब्लॅकमेल अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केली नसून घटनेचा तपास केला जात आहे