Thursday, January 20, 2022

नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गरोदर असल्याचे निदर्शनास आल्याने

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून गरोदर राहिल्याने ही घटना समोर आली आहे. तिच्यावर अत्याचार करणार्‍या तरूणाविरोधात भिंगार कॅम्प पोलीस अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सतीश राजेंद्र सपकाळ रा. भिंगार असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी 28 सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली असल्याची तक्रार तिच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  दिली होती.

त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल  करण्यात आला होता. पोलिसांनी तिला शिर्डी येथुन ताब्यात घेतले. तिने घरी राहण्यास नकार दिल्याने पोलिसांनी तिला बालसुधारगृहात ठेवले. तिच्या आईने तिला घरी नेले. घरात वाद झाल्यामुळे ती घरातून निघून गेली.

पोलिसांनी पुन्हा तिचा शोध घेऊन तिला बालसुधारगृहात पाठविले.दरम्यान, बालसुधारगृहात तिची तपासणी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले.  बाल कल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता

सपकाळ याच्यासोबत तिचे संबंध आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी सपकाळविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करीत आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!