Thursday, January 20, 2022

आज महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेल महागलं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील जवळपास एक महिन्यापासून इंधन दर सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे.

तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढीत्या किंमतीमुळे सर्वसामान्य हैराण असताना, दुसरीकडे मात्र सरकारला वाढत्या किंमतीमुळे फायदा होतो आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पेट्रोलियम उत्पादनांवरील उत्पादन शुल्क

गेल्या वर्षीच्या तुलनेत याच सारख्याच कालावधीत 33 टक्क्यांनी वाढलं आहे.आज सोमवारी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. IOCL ने आज सकाळी जारी केलेल्या रेटनुसार, पेट्रोल 35 पैसे आणि डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे.

राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोल 109.69 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटर झालं आहे.पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
गेल्या काही वर्षांपासून

पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तेल कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या असल्याने इंधन दरात वाढ होतेय. त्याचप्रमाणे डॉलरच्या

तुलनेत भारतीय चलन असलेल्या रुपयाचं मूल्य कमी-जास्त होण्यावरही पेट्रोल-डिझेलच्या किमती अवलंबून असतात.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!