नेवासा
तालुक्यातील जळके बुद्रुक येथील ग्रामपंचायतीची आज 31 ऑक्टोबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील पत्रकार इकबाल हुशेन शेख यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत.
तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सरपंच कैलास झगरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी नानासाहेब झुंबड यांच्या अधिपत्याखाली व मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थच्या उपस्थितीत पार पडली.यामध्ये इकबाल शेख यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
जळके बुद्रुक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इकबाल शेख यांचा
सरपंच कैलास झगरे,उपसरपंच नितीन दहातोंडे यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थच्या वतीने सत्कार केला.
जळके बुद्रुक गावामध्ये वादविवाद,भांडण,तंटे होत असतात ते सोडविण्यासाठी यापुढे तंटामुक्तीसमिती ,सरपंच, उपसरपंच ,ग्रामस्थ आम्ही विशेष प्रयत्न करणार असून गावातील सर्व विविध पदाधिकारी,ग्रामस्थ यांचा निःपक्षपातीपणे विचार करून जळके बुद्रुक गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे नवनियुक्त तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
यावेळी रवी परदेशी,माजी उपसरपंच बाबूलाल शेख,पोलीस पाटील अशोक पुंड, दत्तात्रय लोखंडे,संजय लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य,सुनील शिंदे,रावसाहेब मोटे, संजय बर्डे,विठ्ठल पाठे,प्रशांत राजगुरू, अशपाक शेख,हसन शेख,लक्समन साठे,बाळासाहेब थोरात,विकास जरीपटके, सुरज नागरे, भारत नागरे,दत्तात्रय नाईक, देवीदास राजगुरू, नजीर शेख,अब्दुल्ला शेख, आदी उपस्थित होते.