Thursday, August 11, 2022

कुत्रा चावलेल्या व्यक्तीला रेबीज ऐवजी दिली कोरोनाची लस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली नाही, तर काय होऊ शकतं याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. कुत्रा चावलेल्या एका व्यक्तीला आरोग्य कर्मचाऱ्याने रेबीज ऐवजी चक्क कोरोनाची लस दिली.

झारखंडमधील पलामू जिल्ह्यात ही घटना घडली आहे.झालं असं की, झारखंडमध्ये पलामू जिल्ह्यातील नौहिडा गावात एका व्यक्तीला कुत्र्याने दंश केला. कुत्रा चावल्यानंतर ती व्यक्ती पाटण येथील आरोग्य केंद्रात गेले होते. तिथे त्या व्यक्तीला कोरोनाचीच लस देण्यात आली.

याविषयी आरोग्य अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की, 50 वर्षीय राजू यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. ते कुत्रा चावल्यामुळे रेबीजची लस घेण्यासाठी आले होते. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लस दिली गेली.

पाटण आरोग्य केंद्रात घडलेल्या या प्रकाराबद्दल पलामूचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कुमार म्हणाले, ‘निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी डॉ. एमपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती

नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणला जाईल.’आतापर्यंत लस घेतलेल्या व्यक्तीची तब्येत चांगली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

संबंधित कर्मचाऱ्यावर नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असं अनिल कुमार म्हणाले.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!