Thursday, January 20, 2022

हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितले होते. मात्र, नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत

आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा

सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असे यावेळी सोमय्या म्हणाले. नवाब मलिकांचे सारे आरोप हे

केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असेही सोमय्या म्हणाले.

सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘बिल्डर्सकडून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले आहेत. ते पैसे अजित पवार यांनी कुठे-कुठे ट्रान्सफर केले. जावई, बहिण, बायको,

मुलगा आणि आईच्या खात्यात अजित पवार यांनी पैसे ट्रान्सफर केले. अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण कुटुंबात ट्रान्सफर केलेत. 19 दिवसांपासून ईडीच्या धाडी सुरु आहेत. हजार कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती बाहेर आली आहे,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

अशा लेअर केल्यामुळे आपली चोरी पकडली जाणार नाही, असं पवारांना वाटतेय का? 19 दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. यापासून लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जातेय. नवाब मलिकांची

एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे. ज्यावेळी समीर वानखेडे यांना नोकरी लागली तेव्हा तुम्ही काय करत होतात? असा सवाल सोमय्या यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. फडणवीस यांच्यावर आरोप करत

नवीन मुद्दा उकरुन काढलाय. आधी अजित पवार यांच्या बेनामी संपत्तीबद्दल उत्तर द्यावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. पवार कुटुंबाच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले अन् कुठे गेले? याचं उत्तर आधी द्यावं, असे सोमय्या म्हणाले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!