Saturday, January 22, 2022

नगरमधील त्या चौकात उघड्यावर अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंपिरियल चौकातील पुतळ्याच्या आसपास उघड्यावर अश्लिल चाळे करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके

यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी पोलिस निरिक्षक संपत शिंदे, मनसे विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, संकेत जरे, प्रमोद ठाकूर, धिरज सारसर, पांडूरंग पालवे, प्रविण गायकवाड आदि उपस्थित होते.

पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. कारण या परिसरात संध्याकाळ पासून काही महिला वेश्याव्यवसायाच्या दृष्टीने उभ्या असतात आणि काही

आंबटशौकीन माणसं त्या ठिकाणी महिलांसोबत नको ते चाळे करत उभे असतात. जुन्या बसस्थानकापासून ते थेट जिल्हा परिषदेच्या आवारापर्यंत या करामती चालत असतात.यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पोलिसांच्या गाडीच्या टायमिंग वर सर्व काही खेळ त्या ठिकाणी चालू असतो.

हा विषय या आधी प्रशासनाला माहिती नसेल असेही नाही, पण कोणत्या कारणामुळे या गोष्टींकडे डोळेझाक करण्यात आली, याची देखील आपण चौकशी करावी. संबंधित महिला त्या ठिकाणी ज्या उद्देशाने उभ्या असतात, त्या अवैध धंद्यांसाठी ती जागा नाही, त्या जागेचे पावित्र्य हे कायम राखले गेले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड स्वराज्याचे आराध्य दैवत आणि हा तमाम मावळ्यांच्या भावनेचा विषय आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अन्यथा महाराजांच्या मावळ्यांनी हा विषय हाती घेतला तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल, या विषयांचा गांभिर्याने विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!