Friday, January 21, 2022

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, लवकरच शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन मिळणार असे….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा एकदा बंद करण्यात आली. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय

प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला.कोरोनाचा धोका कायम असल्याने सर्व धार्मिक स्थळांसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिर्डीतील साई मंदिर खुले करण्यात आले

असून साईभक्तांना ऑनलाईन प्रवेश दिला जातोय. मात्र, ऑनलाईन पासच्या नावाखाली शिर्डीत गोरखधंदा सुरू झाला आणि भाविकांची गैरसोय होत असल्याचे साई संस्थानच्या लक्षात आले. ज्यामुळे साई संस्थानने साई मंदिरात ऑफलाईन पास सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवलीय.

मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीत लवकरच ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार असुन दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने तयारी केली. ऑफलाईन पास आणि भक्तांसाठी प्रसादालय सुद्धा सुरू करण्यासाठी

शासनाकडे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सुचनेवरून साईदर्शनासाठी ऑनलाइन पास सक्तीचे करण्यात आले. मात्र, या काळात अनेक भाविकांची गैरसोय होत होती. एवढेच नव्हेतर, ऑनलाईन पासच्या नावाखाली शिर्डीत गोरखधंदा सुरू

असल्याचे अनेक प्रकार समोर आले. दरम्यान, ऑनलाईन पासचा गैरव्यव्हार करणाऱ्या 5 जणांविरोधात संस्थानकडून कारवाई करण्यात आली, असेही भाग्यश्री बनायत यांनी सांगितले.साई मंदिरात दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जात आहे.

म्हणजे दर तासाला जवळपास 1 हजार 150 भाविक दर्शन घेतायेत. दर्शनासाठी जाताना भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. त्याचप्रमाणे, मंदिरातील काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व आरतींसाठी फक्त 90 साईभक्तांना परवानगी देण्यात आली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!