Thursday, January 20, 2022

फोन घेता जरा थांबा:या महिन्यात भारतात लॉन्च होणार हे ‘4’ जबरदस्त फोन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात सणासुदीचा हंगाम सुरु झाला असून सर्व लोक याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. या काळात नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले जातात. जगभरातील स्मार्टफोन निर्माते देखील त्यांचे नवीन जनरेशनचे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

यापैकी काही स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च होणार आहेत.  रिलायन्सच्या Annual General Meeting 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला. रिलायन्सने या नव्या जिओ स्मार्टफोनची निर्मिती Google सोबत मिळून केली आहे.

हा स्मार्टफोन 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होईल. या स्मार्टफोनमध्ये  Pragati ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे. अॅनरॉईड वर आधारित या स्मार्टफोनमध्ये व्हॉइस असिस्टंट, रीड आऊट लाऊड, ट्रान्सलेट फीचर्स, सिंगल रिअर कॅमेरा आणि एआर फिल्टर्स देण्यात आले आहेत.

असूस 8Z स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये भारतात पदार्पण करेल अशी अपेक्षा होती. परंतु हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची चिन्हे दिसत नव्हती. हा फोन नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारात येण्याचा अंदाज आहे. फ्लॅगशिप Asus 8Z मध्ये AMOLED पॅनल,

प्रीमियम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर, 64 MP ड्युअल रियर कॅमेरा, Dirac HD साउंडसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. तसंच क्विक चार्ज 4.0 सपोर्टसह 4,000mAh बॅटरी सुद्धा दिली आहे.

वन प्लसचा 9RT हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 120Hz चा Samsung E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 9RT ची भारतातील किंमत 40,000 ते 44,000 रुपयांपर्यंत असू शकते.

रेडमी नोट 11 स्मार्टफोन 28 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. रेडमी नोट 11 पुढील महिन्यात भारतात येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 90Hz चा डिस्प्ले, मीडियाटेक चा 810 SoC प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, MIUI 12.5 आधारित

Android 11 आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर यापैकी एखादा पर्याय नक्कीच विचार करु शकता.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!