Saturday, January 22, 2022

नगर जिल्ह्यातील हे कांदा मार्केट ‘इतके’ दिवस राहणार बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :चालू वर्षी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने लाल(पावसाळी) कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांद्यांच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यांच्या दरात तेजी राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केट 8 दिवस बंद राहणार असून सोमवार 8 सप्टेंबरपासून मार्केट पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती मार्केट कमिटीच्या सुत्रांनी दिली.

घोडेगाव येथे शनिवार 30 नोव्हेंबर रोजी कांदा लिलाव झाल्यानंतर दिवाळीमुळे 8 नोव्हेंबरला लिलाव होणार आहेत. काल सोमवारीही लिलाव झाले नाहीत.

दरम्यान आगामी काळात बाजारात लाल कांद्यांची किती आवक होते, यावरून शेतकरी बांधवांनी चाळीत साठवून ठेवलेला परंतु काही अंशीच शिल्लक असलेल्या उन्हाळ (गावठी) कांद्यांचे दर अवलंबून असून सध्या तरी लाल कांद्यांची आवक

महिनाभर वाढेल, अशी अपेक्षा नसल्याने उन्हाळी कांद्यांचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता येथील कांदा व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!