Thursday, August 11, 2022

खा विखे म्हणतात मी कामांमध्ये टक्केवारी न घेणारा लोकप्रतिनिधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील डिकसळ ते जामगाव रस्ता, जामगाव ते दैठणे गुंजाळ रस्ता,धोत्रे बृ येथे सभामंडप यासंह अन्य कामांसाठी 7 कोटी 53 लाख रूपयांचा निधी मंजुर झालेला आहे.

या कामांचा प्रारंभ खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, विकास रोहकले, वसंत चेडे, सरपंच बंटी गुंजाळ आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईचे काय झाले? राज्यभरात रस्त्यावर खड्डे पडले आहेत यावर कोणी बोलणार आहे का ? यासह अन्य महत्त्वाचे प्रश्न सोडुन महाविकास आघाडीतील

पक्षाचे प्रवक्ते अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. सामान्यांची काळजी करा. तुरूंगात गेलेल्यांची नको अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता केली.

खासदार डॉ. विखे पुढे म्हणाले, मी कामांमध्ये टक्केवारी न घेणारा लोकप्रतिनिधी आहे. विकासकामे सुरू असताना नागरिक व पदधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष द्यावे. ती दर्जेदार व्हावी कामांमध्ये कोणतीही तडजोड करू नये. निधी उपलब्ध करणे माझे काम आहे. त्यानंतर तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

सत्तांतर करणे फार सोपे असते मतदान टाकताना कोणाला निवडून आणता त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर कसा होतो ते ही पाहिले पाहिजे, असे सांगत खासदार विखे पाटलांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके यांना टोला लगावला.

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!