Monday, July 4, 2022

पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा भडकले; जाणून घ्या आजचे दर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :गेल्या जवळपास महिन्यापासून इंधन दर सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे.

तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशातील इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या कच्चे तेल आणखी महाग होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सुरूच आहे. ज्यामुळे सामान्यांचं बजेट दिवसेंदिवस कोलमडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. आज मंगळवारी महिन्याच्या

दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ झाली असून आज डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL ने जारी केलेल्या लेटेस्ट दरांनुसार आज पेट्रोल 35 पैशांनी महागले आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर 115.85 रुपये प्रति लीटर आहेत, तर डिझेल 106.62 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपार आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशाला चाप बसत आहे.दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील

HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन

ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो.

आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

ताज्या बातम्या

नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पकडली

नेवासा नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत. याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले...

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...
error: Content is protected !!