माय महाराष्ट्र न्यूज :100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली .
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं.
तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते.
गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली.सायंकाळी ७.३० वाजता ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. ते थेट ईडी कार्यालयात गेले.
त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.दरम्यान, अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. आता पुढचा नंबर हा अनिल परब यांचा असणार आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.