माय महाराष्ट्र न्यूज:काल सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत 5463 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला 3000 रुपये भाव मिळाला.काल बाजार समितीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2600 ते 3000 रुपये असा भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 1850 ते 2550 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 900 ते 1800 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 2000 ते 2300 व जोड कांदा 100 ते 800 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
दरम्यान राहाता येथीलच सोयाबिनला प्रतिक्विंटलला कमीत कमी 5100 रुपये तर जास्तीत जास्त 5275 रुपये भाव मिळाला.सरासरी 5150 रुपये भाव मिळाला. गव्हाला सर्वाधिक 2100 रुपये तर मकाला 1744 मिळाला. हरबरा सफेद 4051 रुपये,
हरबरा डंकी 4101 रुपये, बाजरी 1652 रुपये तर संत्री 142 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला प्रतिक्विंटलला कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1100 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.