Sunday, July 3, 2022

वर्षभर घरात पैसा पाहिजे असेल तर आज धनत्रयोदशीला करा हे उपाय

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीच्या दिवशी लक्ष्‍मी मातेची  पूजा  करण्याआधी भगवान धन्वंतरी आणि कुबेर  देवाची पूजा केली जाते. जेणेकरुन भाविकांना चांगले आरोग्य आणि धन प्राप्ती व्हावी. असे म्हटलं जातं की, समुद्र मंथनामध्ये धनत्रोयदशीच्या दिवशी

आरोग्य देवता भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळे त्यांची पूजा केली जाते. यावर्षी 2 नोव्हेंबर 2021 मंगळवारी धनत्रोयदशी आहे.या दिवशी खरेदी केल्याने वर्षभर घरात आनंद राहील. याशिवाय या दिवशी तोटके केल्यानेही खूप फायदा होईल.

चंदीगडचे ज्योतिष मदन गुप्ता सप्तू यांनी सांगितले की, व्यक्तीने  धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती कामे केली पाहिजेत. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या मुख्य दरवाजासमोर साफसफाई करून रांगोळी काढावी.

अगोदर संपूर्ण घराची साफसफाई करून कचरा, अनावश्यक गोष्टी फेकून दिल्या आहेत याची खात्री करा. घरात तुटलेली भांडी असतील तर तीही फेकून द्यावीत. तसेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अशी वस्तू खरेदी करा जी दीर्घकाळ वापरायची आहे. जसे घर, कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी.

याचबरोबर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर पिठाचा चारमुखी दिवा लावावा. ते तांदूळ किंवा गव्हाच्या ढिगाऱ्यावर(रासीवर) ठेवणे चांगले.  या दिवशी गरजूंना औषध दान करा. असे केल्याने आरोग्य चांगले राहते.

जुनी फाटलेली पर्स बदलण्याचा उत्तम दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी नवीन पर्स किंवा बॅग खरेदी करा. यामध्ये तुमची इच्छा एका चिठ्ठीत लिहा, श्री यंत्र, गोमती चक्र, गोवऱ्या, हळदीचा ढेकूळ, पिरॅमिड, लाल रंगाचे कापड, लाल रेशमी धाग्यात गाठ घालून ते पर्समध्ये ठेवा.

असे केल्याने मनोकामना काही दिवसात पूर्ण होईल.मेष, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांनी लाल, पिवळा, केशरी किंवा तपकिरी रंगाची पर्स किंवा बॅग घेतल्यास चांगले होईल. दुसरीकडे, वृषभ, तूळ, कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरी, चांदी, सोनेरी किंवा आकाशी

रंगाची पिशवी/पर्स चांगली असेल. याशिवाय मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, काळा किंवा राखाडी रंग तर मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवी पर्स/बॅग खरेदी करणे शुभ राहील.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!