माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांनी व त्याच्या मित्राने मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मध्ये घडली आहे.
या निर्दयी वडिलाने गेल्या महिनाभरासापून मुलीवर अत्याचार केले आहे. विशेफ म्हणजे यासाठी मुलीच्या आईने कोणताही विरोध केला नाही. याउलट असे कृत्य करण्यासाठी प्रवृत करण्यास आईचाही सहभाग असल्याचे समजले.
या घटनेप्रकरणी वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीने तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी सावत्र बाप, त्याचा मित्र आणि जन्मदात्या आईविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपी वडील राजू लक्ष्मण सोळसे व आरोपी मित्र सतीश कनगरे असे यांची नावे आहेत.
या घटनेनंतर पोलिसांना आरोपीवडीलास अटक केली आहे. मात्र आरोपी मित्र व आई फरार आहे. पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.पीडित मुलीचे वय १४ असून ती औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी वसतिगृहात वास्तव्याला आहे. मुलीच्या पायाची काही दिवसांपुर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यामुळे ती तिच्या आई-वडिलांकडे वर्षभरांपासून राहत होती. दरम्यान तिच्या वडिलाने व मित्राने मिळून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यास सुरुवात केली. वर्षभरापासून हा घृणास्पद प्रकार चालू होता मुलीने अनेक वेळा या प्रकरणाची वाचा फोडण्याचा पर्यंत केला मात्र वडीलांनी व आईने मिळून गुप्तांगात मिरची पावडर टाकण्याचे धक्कादायक कृत केले.